LearningJourney of Aruna Soman of ComePostVille Marcela अंदाजे चार-पाच वर्षापूर्वी दररोजची स्वयंपाक घरातली स्वच्छता झाली की जमा झालेला कचरा आता कुठे टाकू? even झाडाचा पाला पाचोळा ह्याची विल्हेवाट कशी करु असा गहन प्रश्न मला पडायचा. उघड्यावर इतरांच्या मोकळ्या जागेत कचरा फेकणंही मनाला पटत नव्हतं आणि स्वतःचे हात ही असं करायला धजत नव्हते. गाई गुरांच्या मुखी देण्या साठी त्यांची वाट बघत बसायचे आणि केव्हा केव्हा तीन -तीन दिवस कुजलेला कचरा दुर्गंधी,आणि माशांना आमंत्रण द्यायचा. पर्यायी व्यवस्था म्हणुन . नविन जागेत नविन लावलेल्या झाडांच्या मुळात हा कचरा कुजण्या साठी टाकला जायचा पण भटकी कुत्री, मांजर ,पक्षी ते इतरत्र पसरायचे आणि परत ती होणारी घाण सहन व्हायची नाही . केव्हा केव्हा नविन झाडांना त्याच विघटन होताना होणारी उर्जा(गर्मी) सहन व्हायची नाही आणि झाडं मरुनही जायची .. अशा अनेक जटील समस्यांना सामोरे जाताना आणि उत्तर शोधताना.. माझ्या स्नेही वासंती ताई ह्यांनी व्हटस्अॅप वर पाठवलेल्या लिंक द्वारे मी come post (compost)च्या दुनियेत प्रवेश केला . मिळणार्या सुचनांचा पाठपुरावा करयला सुरवात झाडं लावायच्या कुंडीतुनच केली . पहिला प्रयोग फसला(कम्पोस्टला दुर्गंधी आणि किडे झाले) नाद सोडणारच होते पण इतरांचे यशश्वी प्रयोग वाचताना, पाहाताना हे काही फार अवघड नाही असं वाटायच . आणि पुन्हा सुरवात ..काटेकोरपणे सर्व व्यवस्थित केल्यावर सुध्दा गडबड झालीच .. नंतर जमिनीत मोठ्ठा खड्डा खणुन नविन सुरुवात ... आलेल्या सफलतेन थोडा confidence वाढला आणि परत नव्या जोमाने पुर्ण success storyचीसुरुवात झाली .. मोठ्ठा ड्रम भरुन होणार्या compost च्या वापरामुळे समाधान मिळत गेलं आणि "माझा कचरा माझी जबाबदारी," आपण निभावतोय ह्याचा आनंद एक वेगळाच असतो.. इतरांनीही अशीच सुरुवात करावी अनुभवातुन खुप चागले results नक्कीच मिळतील .. आपण केलेलं compost ,bioenzyme झाडांना वापरुन मिळणारी फळ-फुलं अमृता समान असतात नक्कीच... #ComePostVille
Learning Journey of Mrs Aruna Soman of ComePostVille Marcela
Updated: Aug 28, 2022
Comments